मुंबईमहाराष्ट्र

Samana Article : ईडीच्या धाडीवरून सामना वृत्तपत्रातून भाजपावर निशाणा

Samna Article News Once Again Samna Editor Taeget Bjp : सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई :- शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Thackeray Group यांचे मुखपत्र असलेले सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी PM Modi दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे. दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले. ‘चॅरिटी बिगिन्स ॲट होम’ याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा. पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनांचा घोटाळा आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. 15 लाखांच्या भूलभुलय्यात ती फसली, मात्र ‘ईडी’ रकमेची तुमची लोणकढी थाप प. बंगालमधील जनतेला फसवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा ! Samana Article

सामना अग्रलेख जशास तसा
‘ईडी’ रकमेची लोणकढी !

तोंडभरून डभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील १० वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा प. बंगालच्या आकाशात सोडला आहे. प. बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरीबांना वाटणार, असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखविले आहे. प. बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांनी अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गरीबांकडून लुटलेला पैसा गरीबांना परत करण्याच्या फुग्यात हवा भरली. मोदी यांनी ही घोषणा करताना सांगितले की, ‘प. बंगालमधील ईडीने सुमारे तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा सगळा सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा आहे. त्यातील बहुतांश रक्कम ही नोकरी मिळविण्यासाठी घेतली गेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा हा पैसा तिचा तिला मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे. भाजप सरकार त्यासाठी काही ना काही मार्ग काढेल.’ लाचखोरी किंवा अन्य मार्गाने सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा परत जनतेलाच मिळावा, असे म्हणण्यात कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त मोदी यांचे

हे आश्वासन

त्यात उतरणार की आजपर्यंतच्या अनेक आश्वासनांप्रमाणे सत्या

लोकसभा निवडणूक संपल्यावर हवेत विरून जाणार? हा खरा प्रश्न आहे. मोदी बोलतात खूप, भावनांना हात घालत आश्वासनांची पीकपेरणी करण्यात ते तरबेज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या या पेरणीचे पीक आपल्या पदरात का पडू शकलेले नाही, हा प्रश्न आजही जनतेला पडला आहे. पुन्हा त्याचे उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष आश्वासनांचे बिनहवेचे फुगे हवेत सोडत बसला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी आणि त्यांच्या पक्षाने ‘महंगाई डायन’ नष्ट करण्याचे, काही कोटी रोजगार निर्माण करण्याचे, जीवनावश्यक वस्तूंची स्वस्ताई आणण्याचे आश्वासन दिले होते. आज सलग दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतर काय चित्र आहे? ना महागाई हटली ना बेरोजगारी. ना विकास झाला ना नवीन रोजगारनिर्मिती. किंबहुना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्थेचा ताजा अहवाल मोदी सरकारच्या रोजगारनिर्मितीच्या दाव्यांचे वस्त्रहरण करणारा ठरला आहे. देशातील तब्बल 83 टक्के बेरोजगार तरुण आहेत. त्याचप्रमाणे अडीच दशकांपूर्वी बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा टक्का ३५.२ इतका होता. तो आता थेट ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारच्या आश्वासनांची तहा ही अशी आहे. आणि तरीही मोदी आता प. बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा गरीबांना परत करण्याच्या बाता करीत आहेत. 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले. मोदी यांनी आपले शब्दही गिळले आणि वल्गनादेखील. आता प. बंगालमध्ये ईडीच्या कस्टडीत असलेले तीन हजार कोटी रुपये तेथील गरीबांना वाटण्याचे शब्ददेखील मोदी निवडणुकीनंतर गिळून टाकू शकतात. आधी तुमचे ते 15 लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा. पुन्हा ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे.

दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले. ‘चॅरिटी बिगिन्स ॲट होम’ याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा. पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनांचा घोटाळा

आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. 15 लाखांच्या भूलभुलय्यात ती फसली, मात्र ‘ईडी’ रकमेची तुमची लोणकढी थाप प. बंगालमधील
जनतेला फसवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0