Uddhav Thackeray Gat : ठाकरे गटाचे स्टार प्रचारक मैदानात..!
•लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार असून हे प्रचारक मैदान गाजवणार
मुंबई :- देशासह राज्यात लोकसभेचा धुराळा उडाला असून आता सर्व पक्षांनी उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. सर्व पक्षाचे उमेदवार प्रचारात गुंतलेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, 16 जणांची नावे असलेली यादी संजय राऊत यांनी ट्विट केली, त्याचवेळी दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवाराची घोषणा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली होती. आता शिवसेनेकडून स्टार प्रचारकाची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये 40 जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये पक्षप्रमुखासह खासदार, आमदार, शिवसेना,युवा सेना पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेना उबाठाची जबाबदारी
सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकत्र होती. त्यावेळी 18 खासदार निवडून आले होते. आता उद्धव ठाकरे यांनी 17 जणांची नावे जाहीर केली आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाची भूमिका आणि तिकीट मिळालेल्या खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी स्टार प्रचारकांवर असणार आहे.
स्टार प्रचारकांची नावे यादी
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.