Uddhav Thackeray Gat On PM Modi : घाटकोपर दुर्घटनेला दोन दिवसही उलटले नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मधून रोडशो
•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला विरोधकांकडून टीका
मुंबई :- सोमवारी शहर आणि उपनगराला वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या. घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपवर मोठे होर्डिंग कोसळल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला तर 75 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेला आता 45 तास उलटले आहेत तरी मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. एनडीआरएफचे पथक काम थांबलेले नाही. एवढे चालू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मधील रोडशो काय थांबणार नाही पंतप्रधानाचा आज घाटकोपर मधून रोडशो? विरोधकांकडून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेशी काही घेणेदेणे नाही आहे त्यांना केवळ निवडणुका आणि राजकारण जास्त रस आहे. असा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्या मतदारसंघांमध्ये ‘रोड शो’ करण्याची मागणी महायुतीच्या सहाही उमेदवारांकडून करण्यात येत असताना केवळ ईशान्य मुंबईतील घाटकोपरपुरताच तो सीमित ठेवण्यात आला आहे. शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवारांच्या मतदारसंघात मोदींचा ‘रोड शो’ होणार नाही. पंतप्रधान मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दिंडोरी आणि कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडल्यावर मोदी सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. घाटकोपर (प.)मधील एलबीएस मार्गावर अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतरात हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
घाटकोपरचा हा सर्व भाग ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो. मोदी यांचा ’रोड शो’ ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याच मतदारसंघात होणार आहे. .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार यांच्यासह मंत्री, शहरातील सर्व आमदार-खासदार व अन्य पदाधिकारी रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. या रोड शोमुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती होईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.
एकीकडे घाटकोपर मधील दुर्घटने मध्ये जवळपास चौदाहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरीकडे 75 हुन अधिक लोके या दुर्घटनेमध्ये गंभीरता जखमी झाले आहे. एवढे सर्व चालू असताना भाजपकडून केवळ राजकारण सत्या कारण हे महत्त्वाचे असून जनतेच्या प्रश्नाबाबत जनतेच्या हिताकरिता कोणत्याही प्रकारचे रस नसल्याचं विर्दांकडून सांगितले जात आहे.