मुंबई

Uddhav Thackeray : “ठाकरे ब्रँड चोरण्याचा केविलवाणा प्रयत्न!” — उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका

• “पोकळ लोकांना ठाकरे ब्रँड लागतोय, स्वतः काहीच निर्माण केलं नाही” — उद्धव ठाकरे यांचा सणसणीत आरोप

मुंबई :- मराठी भाषा, अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यांवर राज्यात सध्या मोठा राजकीय खल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक संजय राऊत यांच्याशी केलेल्या संवादात केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षांवर थेट आरोप केले.

“ठाकरे ब्रँड हा आम्ही बनवलेला नाही, तो लोकांनी आमच्यावर लादलेला नाही तर स्वीकारलेला आहे,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा जनतेशी असलेल्या नात्याशी संबंध जोडला. “ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी आणि हिंदू अस्मिता जपली, त्यामुळेच आजही लोक आमच्यावर विश्वास ठेवतात,” असंही ते म्हणाले.

राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वाढलेले वाद, जनसुरक्षा विधेयकावरून झालेला संघर्ष आणि ठाकरे-राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “ठाकरे ब्रँड” चोरल्या जात असल्याचा आरोप केला. “अनेक बँड वाजू लागलेत, ज्यांनी स्वतः काहीच निर्माण केलं नाही, ते आता आमचा ब्रँड चोरण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

त्यांनी स्पष्ट केलं की, “मी सत्तेसाठी नाही, तर जनतेच्या भावनेशी प्रामाणिक आहे. माझ्याकडे काहीही नसतानाही लोक आपुलकीने भेटतात, बोलतात आणि मला सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत.”

याच संवादातून उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडचे राजकीय महत्त्व, सत्ताधाऱ्यांची अस्मितेच्या मुद्द्यावर चाललेली राजकारण आणि जनतेच्या अपेक्षांविषयी स्पष्टपणे भूमिका मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0