मुंबई
Trending

Uddhav Thackeray : अब की बार 400 पार… अब की बार भाजपा तडीपार…. उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray ON BJP : भाजपाच्या 195 लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी चे नाव नसल्याने उद्धव ठाकरे यांची भाजपावर जोरदार टीका

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची मुंबईतल्या धारावी येथे रविवारी (3 मार्च) सभा पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभेच्या 195 उमेदवाराच्या यादीत नितीन गडकरी यांना स्थान नसल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार सडकून टीका केली आहे. Uddhav Thackeray ON BJP

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, साधी गोष्ट सांगतो भाजपाने 195 लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कुणाची नावं आहेत? मोदी-शाह यांची नावं आहेत. पण, आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी नावं माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले. युतीच्या काळात त्यांनी 55 उड्डाणपूल बांधले, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस.. त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. परंतु, मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे, बेहिशेबी मालमत्ता साठवून ठेवल्याचे आरोप केले होते. त्या कृपाशंकर सिंहचं नाव पहिल्या यादीत आहे. परंतु, नितीन गडकरींसारख्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचं नाव या यादीत नाही. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ ही भाजपाची जाहिरात होती ना.. आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. Uddhav Thackeray ON BJP

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, मागच्या वेळी (लोकसभा निवडणूक 2019) युतीचे 42 खासदार निवडून आले नसते तर दिल्लीचं तख्त राहिलं नसतं. महाराष्ट्रगीतात म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आधी दिल्लीचं तख्त फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिथे निर्माण करावं लागेल. यांची जी काही मिजास आहे ‘अब की बार 400 पार’ची, पण मी म्हणतो ‘अब की बार भाजपा तडीपार’.आगामी निवडणुकीत आपल्याला यांना तडीपार करायचं आहे आणि दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवायचा आहे.

भारतीय जनता पार्टीने BJP लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. भाजपाने पहिल्या यादीद्वारे १९५ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या यादीद्वारे उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून दुसऱ्यांदा आणि संरक्षणंमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. हे नाव वाचून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या नावावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनीदेखील आक्षेप नोंदवला आहे. Uddhav Thackeray ON BJP

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0