Uday Samant On Sanjay Raut : सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची हा काहींचा धंदा…. मंत्री उदय सामंत यांची संजय राऊत यांच्यावर टीका
•मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे, सहजशक्ती संपल्यावर असे पावले….
मुंबई :- राज्याचे मंत्री उदय सामंत व्यक्ती संजय राऊत यांना मुख्यमंत्री यांच्याकडून न्यायालयीन नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्या सामान म्हणाले की रोज सकाळी उठून लोकांची बदनामी करण्याचे काहींचे धंदे चालू आहे अशी टीका राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा आरोप सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आला होता. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवले आहे.
राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की,सहनशक्ती संपल्यानंतर अशी पावले उचलावी लागतात मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीबद्दल बोलतांना त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “सहनशक्ती संपल्यानंतर प्रत्येकाला अशी पावले उचलावी लागतात. रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची. प्रत्येकाबद्दल खोटं बोलायचे आणि प्रत्येकाबाबत नकारात्मकता पसरवून संभ्रम निर्माण करायचा हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. माझ्या मते त्यांच्यावर झालेली ही कारवाई योग्य आहे. त्यांना तीन दिवसांची वेळ देऊन माफी मागण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र रोज एखाद्या माणसाबद्दल एखाद्या व्यक्तीबरोबर बदनामी करणे संजय राऊतांच्या माध्यमातून सुरू असते. आता या नोटिशीमुळे ते बंद होईल”, असे उदय सामंत म्हणाले आहे.
खासदार संजय राऊत यांचे नोटिसी नंतर ट्विट
50 खोके एकदम ओके।…इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।..गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document…अब आयेगा मजा!…जय महाराष्ट्र! असे ट्विट करत संजय राऊत यांनी पाठवण्यात आलेल्या नोटीसा चे फोटोही यामध्ये शेअर केले आहेत