मुंबई

Jayant Patil : जितेंद्र आवड यांच्या कृत्याला सुषमा अंधारे आणि जयंत पाटील यांचा कवच

Jayant Patil React On Jitendra Awhad : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार गट जयंत पाटील Jayant Patil यांनी ट्विट करत जितेंद्र आवड Jitendra Awhad यांची घेतली पाठ राखण

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृती विरोधात एक आंदोलन केले या आंदोलनामध्ये जितेंद्र आवाडे Jitendra Awhad यांच्याकडून नकळतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr Baba Saheb Ambedkar यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिसाद उमटले विरोधकांकडून जितेंद्र आवड Jitendra Awhad यांच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अनेकांनी त्यांच्या विरोधात जाहीर आंदोलन केले. या सर्व घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली या सर्व घडामोडीनंतर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील Jayant Patill यांनी जितेंद्र आवाडे यांचे पाठरखन केले आहे या दोन्ही नेत्यांनी आपल्या ट्विट मधून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून नकळत झाल्याचे सांगितले आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की,सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांना ज्ञात आहे.

शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.
पण तरीही याच्या आडून राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांसाठी एक सवाल आहे.

बाबासाहेबांनी मांडलेला प्रत्येक विचार जर शिरोधार्य असेल तर त्याच बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. कारण मनुष्यमात्राला असमान मानणारा विचार हा मानवी कल्याणाचा विचार असू शकत नाही असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले.

त्याच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा अव्हेर करत सरळ सरळ बाबासाहेबांच्या चळवळीला मात देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे.

जर जितेंद्र आव्हाड्यांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे?

– बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप समर्थकांनी हे स्पष्ट करावे की मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात समावेशन होत असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात ?

– त्यासाठी तुम्ही थेटपणे शिक्षण खात्याच्या संबंधित मंत्र्यांना जाहीर प्रश्न कधी विचारले आहेत त्याचा विरोध करायचा म्हणून शिक्षण खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही कधी मागणार आहात?

– बाबासाहेबांचा अपमान जेव्हा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केला त्या वेळेला आत्ताचे भाजपचे छुपे आणि उघड समर्थक हे चंद्रकांत पाटलांच्या बद्दल मूग गिळून गप्प का बसले होते?

– बाबासाहेबांबद्दल खरंच प्रेमाचे उमाळे येत असतील तर इंदू मिलच्या जागेवर कुदळ मारायला आलेले मोदीजी अजून तिथे विटही रचली गेली नाही. यावर हे छुपे आणि उघड समर्थक मोदींना थेटपणे जाब विचारत मोदींना सत्तेतून पायउतार करण्याची भाषा करतील का?

जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळली गेले तेव्हा ती प्रत जळणाऱ्या आरएसएस समर्थकांच्या विरोधात आत्ताचे भाजपचे छुपे किंवा उघड समर्थक रस्त्यावर का उतरले नाहीत?

बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान असेल तर मग भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही ?

तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही कारण तुमचा बौद्धिक हलकटपणा चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढवय्ये चळवळे लोक जाणून आहेत…! I love you बाबासाहेब आंबेडकर…!!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की

जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही.

आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे.

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

Web Title : Jayant Patil : Sushma Andhare and Jayant Patil cover Jitendra Award Mahad Incident ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0