Maharashtra Lok Sabha Live Update : महायुतीत जागेचा तिढा सुटता सुटेना
Mahayuti Mumbai candidate List : उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या महायुती तिढा कायम
मुंबई :- महाराष्ट्रात अद्याप महायुतीच्या उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सुटताना दिसून येत नाही. मविआसमोर उत्तर मुंबईचा पेच आहे. नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघरला महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. म्हणजे मुंबईसह एकूण ७ जागांवर महायुतीच्या Mahayuti उमेदवारांचा तिढा कायम आहे. Mahayuti Mumbai candidate List
उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदेसेनेला सुटली आहे. दक्षिण मुंबईसाठी भाजप, शिंदेसेनेत रस्सीखेच आहे. शिंदेसेनेकडून उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे, तर उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकला विद्यमान खासदार हेमंत गोडसे, पालघरला राजेंद्र गावित, कल्याण-डोंबिवलीला श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात शिंदेसेनेकडून रवींद्र फाटक, तर भाजपकडून संजीव नाईकांची नावे स्पर्धेत आहेत. मात्र, निर्णय होत नाही, अशी स्थिती आहे. Mahayuti Mumbai candidate List
मुंबईतील मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी मध्ये कोणत्या जागेवर लढत
- उत्तर मुंबई पीयूष गोयल (भाजप) महाविकास आघाडी उमेदवार नाही.
- उ. प. मुंबई अमोल कीर्तिकर (ठाकरे सेना) महायुती उमेदवार नाही.
- उ. पू. मुंबई मिहिर कोटेचा (भाजप) संजय दिना पाटील (ठाकरे सेना)
- उ. म. मुंबई रिक्त वर्षा गायकवाड (काँग्रेस)महायुती उमेदवार नाही
- द. म. मुंबई राहुल शेवाळे (शिंदे सेना) अनिल देसाई (ठाकरे सेना)
- दक्षिण मध्य रिक्त अरविंद सावंत (ठाकरे सेना)महायुती उमेदवार नाही