मुंबईक्राईम न्यूज

Panvel Police News : पोलिसांनी विविध 38 गुन्ह्यातील लाखो रुपयाचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट !

पनवेल :- पनवेल शहर पोलीस ठाणेकडील Panvel Police Station सन 2008 ते 2023 या कालावधीमधील विविध दाखल 38 गुन्हयामधील दारूच्या बॉटल, कॅन व अन्य जप्त करण्यात आलेला मुददेमाल मा न्यायालयाचे आदेशाने करंजाडे येथे नष्ट करण्यात आला. Panvel Crime News

पनवेल शहर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्हयांमध्ये Liquor Crime 65 ई कलमान्वये दारूच्या बॉटल, कॅन व अन्य मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयाचा तपास पुर्ण होवून आरोपीत यांचे विरूध्द मा.न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. जप्त मुद्देमाल मोठया प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुददेमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. Panvel Crime News

या गुन्हयातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दिर्घ कालावधी पासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होवून खराब होत होता. तसेच दारूचे कॅन उंदीर कुरतडून मुददेमाल नाश होत होता. बदलत्या हवामानाचा परिणाम होवून उग्र वास येत होता. त्याचा परिणाम पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच पोलीस ठाणे येथे कामकाजाकरिता येणारे नागरीक यांच्या आरोग्यावरती होत होता. याकरिता पोलीस ठाणे कडील जप्त साठयाची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, पनवेल जि रायगड यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाणेकडील 38 गुन्हयामध्ये दारूचा मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते. Panvel Crime News

सदर आदेशामध्ये मुददेमाल नाशकरणे बाबत मा न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते. त्याप्रमाणे मा.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांचे आदेशाने पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ-2चे विवेक पानसरे, सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे त्यांच्या विशेष पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण कडील एकुण 38 गुन्ह्यामधील 90 मिलीच्या 767 बाटल्या, 1980 मिलीच्या 1942 बाटल्या , 750 मिलीच्या 1585 बाटल्या, 600 मिलीच्या 89 बाटल्या, अशा एकूण 4375 बाटल्या ( रू 7,50,000/- पेक्षा अधिक किंमतीचा ) हा मुद्देमाल पोनि फणसेकर राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर, वाय एस लोळे, दुयम निरीक्षक उत्पादन शुल्क, पनवेल शहर, एस ए जाधव, दुयम दुयम निरीक्षक उत्पादन शुल्क, पनवेल शहर, तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रशासन भगत, सपोनि राजपुत, सपोनि शेटे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ याचे उपस्थितीत करंजाडे सेक्टर -5 या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमुद मुददेमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली. Panvel Crime News

Web Title : Panvel Police News : The police destroyed the confiscated items worth lakhs of rupees in various 38 crimes

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0