कौटूंबिक वादातून घाटात नेऊन पत्नीचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या पतीची झाडावर गळफास घेत आत्महत्या
उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा डोक्यात दगडाने ठेचून ठार मारले त्यानंतर झाडाला गळफास घेऊन पतीची आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हकीकत सांगितले.
“माझी विवाहीत मुलगी सुवर्णा हीची सवत रंजना, तीची मुलगी स्नेहल हे जावई सोमनाथ सखाराम वाघ यांना वाईट सांगत असे व तो देखील त्यांचे ऐकुन तीला शिविगाळ करुन “तुला जीवंत ठेवणार नाही” असे म्हणुन बेदम मारहाण करित असे. तसेच तीची सवत रंजना व तीची मुलगी स्नेहल हे तीला सारखे टोमणे मारुन ठेवलेली बाई म्हणुन हिणवत होते. सुवर्णा हीचे पती, सवत हे नेहमी तीला “तुला आम्ही मुलांसाठी आणले आहे, तुझी मुले ठेऊन तुझे माहेरी निघुन जा, तुझी आम्हांला गरज नाही” असे बोलुन मानसिक त्रास देत असत. तसेच गेल्या महीन्यात सुवर्णा हीचे सवत सौ. रंजना व तीची मुलगी स्नेहल हीचे सांगणे वरुन नवरा सोमनाथ याने तीचे कपडे काढुन मारहाण केली होती. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.06 वा.चे सुमारास जावई सोमनाथ यांनी माझी मुलगी सुवर्णा हीला फिरायला जाणेचे बहाण्या वरुन घेऊन जाऊन कमळादेवी मंदीराचे पुढे पिकॉक बे, कुडजे, पुणे. येथे रस्त्याचे डावे बाजुस असलेल्या झाडांमध्ये नेऊन दगडाने ठेचुन तीला गंभीर जखमी करुन तीचा खुन केला व त्यानंतर तेथे असलेल्या एका झाडाला त्यांचे पॅन्टचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.म्हणुन माझी जावई सोमनाथ सखाराम वाघ, तसेच माझी मुलगी सुवर्णा हीचेबाबत रंजना सोमनाथ वाघ व स्नेहला सोमनाथ वाघ यांनी सोमनाथ वाघ यास नेहमी वाईट सांगुन तीचा खुन करणेस प्रवृत्त केले आहे म्हणुन माझी त्या तीघां विरुध्द तक्रार आहे.” उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे