Thar Movie 2024 : स्वामी स्पर्श फिल्म निर्मित… “थर” चित्रपट येत्या १६ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात
नवी मुंबई (रुपाली वाघमारे): लवकरच दहीहंडी Dahihandi उत्सव येत आहे. हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात सर्वत्र साजरा केला जातो. या उत्सवाची रंगत अशी की उंच उंच एकावर एक असे थर रचत दहीहंडी बाळ गोपाळाच्या हातानी मोठ्या जल्लोषात फोडली जाते. आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात या उत्सवाचे महत्त्व आणि हा उत्सव कसा साजरा केला जातो हे दाखवण्यात आले आहे. पण पहिल्यांदाच हा उत्सव एखाद्याच्या जीवावर, एखाद्याच्या कुटुंबावर कितपत चांगले किंवा वाईट परिणाम करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न स्वामी स्पर्श फिल्मच्या निर्मितीतून निर्माते विलास चव्हाण आणि दिग्दर्शक अमित मोहिते यांनी “थर” Thar Marathi Movie या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे.
कोकणरत्न पुरस्कर, दादासाहेब फाळके पुरस्कार, गुरुगौरव शिक्षक सन्मान, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि विविध शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करून पुरस्कार मिळवलेले तसेच शिक्षक असलेले आणि पहिल्या “थर” या मराठी चित्रपटाची निर्मिती करणारे अभिनेते-निर्माते विलास चव्हाण हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तर या चित्रपटाची सहनिर्मात्या वैदेही विलास चव्हाण या आहेत.
त्यांच्या सोबत अभिनेत्री पुनम विनेकर, अभिनेता-निर्मिती प्रमुख रंगराव घागरे, बालकलाकार कबीर पवार, विलास सोनावणे, प्रमोद सुर्वे, भक्ती प्रधान, परेश मोरे, शिवाजी पाटणे, सुनीता कांबळे, प्रशांत खांडगेपाटील, लोमहर्ष भगत, नयन पवार, ललिता मेंगडे, सुनील गावडे, संजय रायचूरकर, राजेश मढवी यांचा या चित्रपटात समावेश असुन, त्यांच्या सोबत अनेक रंगमंच कलाकारांना चित्रपटात प्राधान्य देण्यात आलं आहे. लाऊन थरावर थर, मल्हारी देव ही गीते विलास चव्हाण यांनी लिहिलेली असून त्यांना संगीतबद्ध संगीत दिग्दर्शन समीर चव्हाण यांनी केली आहेत. तर जसराज जोशी यांनी ती गाणी गायली आहेत. झी म्युझिक वर दोन्ही गाणी प्रदर्शीत झाली आहेत. चित्रपटाचे बरेचसे शुटींग हे नवी मुंबई परिसरात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कै. उमेश पवार आणि अमित मोहिते आहेत.
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आमची विनंती आहे की, १६ ऑगस्ट ला “थर” हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा. असे आव्हान चित्रपटाचे निर्माते विलास चव्हाण आणि दिग्दर्शक अमित मोहिते यांनी केले आहे.