कापूरबावडी पोलिसांची कारवाई, आरोपीला दोन वर्षाकरिता पाच जिल्ह्यात प्रवेश बंदी होती
ठाणे :- राज्याच्या राजकारणातील आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. कापूरबावडी पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला ठाण्याच्या आझाद नगर परिसरातून अटक केली आहे. Thane Tadipar News
आरोपी रोहित लक्ष्मण गायकवाड (25 वर्ष) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 वागळे इस्टेट यांनी ठाणे, मुंबई शहर,मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यातून 13 सप्टेंबर 2023 रोजी दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. परंतु आरोपी गायकवाड 29 फेब्रुवारीला कोणाचीही परवानगी न घेता ठाण्याच्या आझाद नगर परिसरात आले असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी रोहित गायकवाड याला अटक केली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रोहित गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस आर यादव हे करत आहे. Thane Tadipar News