मुंबई

Mahendra Thorave and Dada Bhuse Fight : शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांना भिडले, गोगावले-शंभूराज देसाई मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले

•शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार एकत्र आले आहेत. दरम्यान, शंभूराज देसाई आणि भरत गोगवाले मध्यस्थी करताना दिसले.

मुंबई :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली.सत्ताधारी पक्षातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, महेंद्र थोरवे यांच्या बोलण्याची पद्धती राग आणणारी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते. Mahendra Thorave and Dada Bhuse Fight

आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील काम पूर्ण करून द्या, अशी मागणी आमदार थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे केली होती. मात्र, दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात झालेला वाद विधिमंडळाच्या परिसरात झाल्यामुळे या घटनेला वेगळे वळन मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांमध्ये अशा प्रकारे वाद होत असेल, तर यातून त्यांची संस्कृती दिसून येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. Mahendra Thorave and Dada Bhuse Fight

हाणामारी सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगवाले यांना हस्तक्षेप करावा लागला. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड हे तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाले आता विधानसभेतही पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, ही चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना सोबत घेऊन कार्यालयात नेले. Mahendra Thorave and Dada Bhuse Fight

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0