Thane Tadipar News : ठाण्यातून तडीपार आरोपीला केले अटक
•Thane Tadipar News तडीपार आरोपीला मनाई आदेश भंग केलेले प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून, आरोपीकडे बेकायदेशीर लोखंडी सुरा सापडला
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राहणार असून पोलिसांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. ठाणे नगर पोलीस ठाणे यांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला पाण्याच्या सिडको परिसरातून अटक केली आहे.
आरोपी वैभव प्रभाकर कोळी (41 वर्षे) (चेंदणीकोळीवाडा कोपरी ठाणे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5, ठाणे यांनी ठाणे, जिल्हासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर रायगड या हद्दीतुन 2 वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 27 जुलै 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 ठाणे यांचे परवानगी शिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 01 मे रोजी दुपारी 2.15 वा. चे सुमारास, ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपीकडे 1 लोखंडी सुरा सापडला आहे. प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37(1),135 तसेच भारतीय हत्यार 4,25 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी वैभव कोळी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव हे करीत आहेत.