Thane Sex Racket Busted : परदेशी महिलेच्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
•Sex racket of foreign woman exposed by Thane Crime Branch थायलंडच्या महिलेचा भारतात महाराष्ट्रात पराक्रम, सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून केला पर्दाफाश दोन पीडित महिलांची सुटका
ठाणे :- उल्हासनगरच्या सेक्शन 17 मधील तब्बल परदेशी सेक्स रॅकेटचा ठाण्याच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला होता. थायलंडच्या तब्बल 15 महिलांची या सेक्स रॅकेट मधून पोलिसांकडून सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल चालकासह, मॅनेजर, आणि वेश्या दलाल यांना अटक केली होती. Thane Sex Racket Busted हे प्रकरण ताजे असतानाच ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने धडक मोहीम करत पुन्हा एकदा परदेशी महिलेचा एक पराक्रम समोर आलेला आहे. थायलंडमध्ये राहणाऱ्या (सध्या ठाण्यात वास्तव्यास) एका परदेशी महिलेने भारतात म्हणजेच ठाणे, मुंबई, लोणावळा, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवत आहे.या महिलेचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन पिडित महिलांचे सुटका केली आहे.
वेश्या व्यवसायाचा भांडाफोड,बोगस ग्राहकाने उघड केले पितळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, ठाणे,मुंबई, गोवा आणि लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही महिन्यांपासून विदेशी महिल वेश्याव्यवसाय करिता मुली पूर्वत असल्याची माहिती मिळाली होती.”हॉटेल ला डहलिया”, आर मॉल समोर, चितळसर मानपाडा, ठाणे पश्चिम’ या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवुन पंच व पोलीस पथकाने छापा मारला असता, 1 विदेशी (थायलंड) दलाल महिला (वय 38,रा.घोडबंदर रोड, ठाणे) ही दोन विदेशी महिलांना फूस लावुन त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळुन आलो आहे.Thane Sex Racket Busted विदेशी वेश्यादलाल आरोपी हिच्या विरुध्द चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 ने कलम 143(1), 143(3) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन विदेशी (थायलंड) दलाल महिला आरोपीस अटक करण्यात आली असून दोन विदेशी (थायलंड) पीडित महिला यांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे शाखा धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रध्दा कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार के.बी. पाटील, पोलीस अंमलदार व्ही यादव तसेच गुन्हे प्रणाली शाखेकडील महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशा कांबळे, पोलीस हवालदार पी एस राणे, महिला पोलीस हवालदार आशा मोरे, पोलीस नाईक डी. एस. सावंत, महिला पोलीस अंमलदार संगीता प्रधान, पोलीस अंमलदार सुहास खंदारे, यु.एम. घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.