Thane Scam News : आर्थिक फसवणूक ; फेडेक्स कुरिअर कंपनीच्या नावाने फसवणूक
Thane Crime News : ऑनलाइन फसवणूक करून स्काईपव्दारे स्क्रीन शेअर करत फसवणूक
ठाणे :- ऑनलाइन फसवणूक Online Scam झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये फिर्यादीचे आरोपीने तुमचे कुरियर पोलिसांनी पकडले असून फेडेक्स कुरिअर Fedex Courier Scam मधून बोलत असल्यापासून ऑनलाईन लाखोंची फसवणूक झाल्याचे घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये फिर्यादी याला ऑनलाईन स्काईपद्वारे स्क्रीन शेअर करत 6 लाख 74 हजार रुपये ट्रान्सफर करायला समोर आली आहे. फिर्यादी याची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. Thane Crime News
27 एप्रिल 2024 रोजी दुपारी 11.34 वा.चे सुमारास फिर्यादी राजस सुशील दळवी, (रा.नौपाडा, ठाणे पश्चिम) यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने फोन करून फेडेक्स कुरीयर मधुन बोलत असल्याचे सांगुन मुंबई वरून इराणला पाठविलेले पार्सल पोलीसांनी पकडले असल्याचे खोटे सांगुन ऑनलाईन स्काईपव्दारे स्क्रीन शेअर करणस सांगुन फिर्यादी यांचे बॅक खात्यातुन एकुण 6 लाख 74 हजार 541रूपये ही रक्कम ट्रान्सफर करण्याला लावुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबालधारक आरोपीविरुध्द भादवि कलम 419,420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळक हे करीत आहेत. Thane Crime News