Dombivli Crime News : ऑनलाइन फसवणूक ; पार्ट टाइम नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
•ऑनलाइन फसवणुकीमध्ये तरुणाला आठ लाखावून अधिक किंमतीचा गंडा
डोंबिवली :- सायबर ब्रांच मधून सातत्याने जनजागृती करिता सांगण्यात येते की कोणत्याही प्रकारे ऑनलाईन खरेदी विक्री किंवा चुकीच्या ॲप मध्ये आर्थिक गुंतवणूक करू नका अन्यथा आपली फसवणूक होईल त्याबाबत खात्रीशीर माहिती गोळा करूनच ऑनलाईन किमतीचे व्यवहार करा असे पोलिसांकडून सातत्याने सांगत असतानाही लोकांचे मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट ऑनलाईन खरेदी-विक्री अशा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक होत असते घटनांच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे. पार्ट टाइम नोकरीच्या नावाखाली गुगलवर रिव्ह्यू देण्याचे टास्क असल्याचे सांगितले असून त्याद्वारे आर्थिक फसवणूक होत असल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली मध्ये तरुणांकडून जवळपास आठ लाखाहून अधिक केंद्राची फसवणूक झाल्याची घटनाची तक्रार विष्णू नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
देवेंद्र भगवान पाटील, (38 वर्षे) रा.कोपर रोड, डोंबिवली पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक इसम याने टेलिग्रामवर मेसेज करुन त्यानंतर ग्रुपमध्ये ॲड करून पार्ट टाईम नोकरी देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना ऑनलाईन टास्क पुर्ण करण्याकरीता आरोपीत याने दिलेल्या वेगवेगळया बँक खातेत एकुण 8 लाख 01 हजार 317 रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगुन ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करीत आहेत.