क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Medical Shop Robbery : मेडिकल दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी, दोन भुरट्यांना अटक, एक फरार

Thane Medical Shop Robbery News : चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रोख रक्कम आणि घड्याळ चोरीला.7 गुन्हे उघडकीस

ठाणे :- शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण Thane Crime News दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या Kalwa Police Station हद्दीत एका मेडिकल दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. यामध्ये मेडिकलच्या गल्ल्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि लेडीज घड्याळ चोरीला गेल्याचे फिर्यादी यांनी सांगितले आहे. Thane Medical Shop Robbery पारसिक नगर जवळ साईनिधी केमिस्ट या मेडिकल मध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एक आरोपी अजूनही फरार आहे. Thane Latest Crime News

गुन्हा नोंद होताच आरोपी यांचा शोध घेण्यासाठी कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे व पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे यांच्या 2 टीम तयार करून घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून, त्या आधारे यातील आरोपीचा गुन्हा करण्यासाठी येण्याचा व गुन्हा करून जाण्याचा मार्ग शोधून काढत असताना पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे व त्यांच्या पथकास यातील आरोपीच्या ठावठिकाणा बाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती.त्यांनी तपासात सातत्य ठेवून तात्काळ मोठ्या मेहनतीने तेथील गुप्त बातमीदारा मार्फत व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने यातील आरोपीस वरद कांबा, मौर्या नगरी, उल्हासनगर, ठाणे येथे सापळा रचून त्यांस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडे अजून सखोल चौकशी केली असता ठाणे, नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली देऊन घडलेला गुन्हा आणि इतर 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. Thane Latest Crime News

अटक आरोपी नाव

1) राजवीर संजू सिंग लाहोरी (19 वर्ष, रा.वैष्णव देवी मंदिराजवळ, बाल्कनी बारी स्कूल जवळ, उल्हासनगर नं. 3,)
2) क्रिश अनिल लोटवाणी (19वर्ष राह. गोल मैदान, नाना नानी गार्डन जवळ, बॉक्सर पाडा, उल्हासनगर नंबर 2)
3) सलमान अहमद तारीख शेख ( अंदाजे 20 वर्षे, रा.पंजाबी कॉलनी, कविता मेडिकलचे बाजूला, उल्हासनगर नंबर-3,) फरार असून पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305(3),(5) दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींच्या विरोधात कळवा, कल्याण रेल्वे पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस, टिटवाळा पोलीस, महात्मा फुले चौक आणि पनवेल पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे.

पोलीस पथक
विनायक देशमुख अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर, सुभाषचंद्र बुरसे पोलीस उपायुक्त (परि.1 ठाणे ) उत्तम कोळेकर सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कळवा, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड ( गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.टी. धोंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संजय गावडे, पोलीस हवालदार आर डी पाटील,शहाजी एडके,संदीप महाडिक,राहुल पवार ,गणेश बांडे,श्रीमंत राठोड,अमित सकपाळ,महेंद्र शेळके, पोलीस शिपाई महादेव हजारे,स्वप्निल खपाले,अमोल ढावरे,नामदेव कोळी,प्रशांत लवटे यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. Thane Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0