उद्धव ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांना शिवसेनेकडून ए बी फॉर्म
Rajan Vichare Thane Loksabha Election Constituency : ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म
मुंबई :- 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये Thane Loksabha Election Constituency शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे असं सामना लागणार आहे तर दुसरीकडे पवार विरुद्ध पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार Sharad Pawar असं सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुका काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेकडे असतानाच आता ठाकरे गटाकडून सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचे काम चालू आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांचा शिलेदार शिंदेंना लढत आहे. अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले परंतु राजन विचारे Rajan Vichare यांनी कोणत्याही प्रकारे उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आहे.
राजन विचारे सलग दोन वेळा लोकसभेवर ठाणे लोकसभा क्षेत्रातून निवडून गेले आहे यंदाची त्यांची हॅट्रिक मारणार का ? हे पाहावे लागेल.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या उमेदवारी यादीत राजाने विचारे यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला असून आज त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला आहे. राजन विचारे यांनी यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंददायी दिघे यांच्या आशीर्वादाने स्वीकारून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली यंदाची निवडणूक लढविणार आहे.