Thane Breaking News : ठाण्यातून धक्कादायक घटना 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण!
Thane Latest 14 year Girl Kidnapping News : गौतमी स्कूल ठाणे पश्चिम येथून मुलीचे अपहरण, ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे :- ठाण्यात नेमकं चालले तरी काय? सातत्याने ठाण्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या शाळेच्या परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे घटना ठाण्यात समोर आली आहे. Thane Latest 14 year Girl Kidnapping News या घटनेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसरातून 14 वर्षीय मुलीचे अपहरण होणे हे अतिशय धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.
पूजा हरसन राम पुरोहित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव असून तिचे गौतमी स्कूल, ठाणे पश्चिम येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात Thane Nagar Police Station दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून पूजा ही कुठे आढळल्यास किंवा भेटल्यास ठाणे नगर पोलिसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना ताटे-केचे (8425899933) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नेमकं काय घडलंय? अपहरण की घातपात? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारमार्फत मुलींचा शोध घेत आहे.