पुणे

Pune Crime News : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ? गंभीर आरोपामुळे खळबळ

•जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंगाचा दावा; आंदोलन करूनही गुन्हा दाखल नाही, पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार

पुणे :- शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात आणले असता, तिथे रिमांड रूममध्ये त्यांना पाच तास त्रास दिला गेला. या काळात पोलिसांनी जातीवाचक शेरेबाजी केली आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप पीडित मुलींनी केला आहे. या प्रकारानंतर निषेधार्थ आंदोलन करूनही, अद्याप संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घडलेली घटना सांगताना एका पीडित तरुणीने माध्यमांना सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरमधील एका केससाठी पोलीस आमच्या घरी आले होते. त्यांनी कोणतेही वॉरंट किंवा पूर्वसूचना न देता घरात प्रवेश केला. बाथरुम आणि बेडरूममध्ये घुसून त्यांनी तपासणी केली, इतकंच नव्हे तर आमच्या अंतर्वस्त्रांचीही तपासणी करण्यात आली.” पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली आणि खासगी आयुष्याबाबत नको-नको ते बोलल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. जाब विचारल्यावर, ‘तुम्ही पोलीस ठाण्यात चला, आम्ही दाखवतोच,’ अशी धमकी पोलिसांनी दिल्याचेही तिने सांगितले.

या प्रकरणी आमदार रोहित पवार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र, चर्चा होऊनही आरोपी पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0