ठाणे

Thane Drugs News : 48.41 लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

•ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले.

ठाणे :- ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्या कडून 242.09 ग्रॅम वजनाचा 48.41 लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे.

घेवारास ओखाराम पटेल (21 वय रा. हैदराबाद, तेलंगणा राज्य मुळ रा.जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पटेल हा गायमुख, घोडबंदर रोड, ठाणे परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अजय रावसाहेब सपकाळ यांना मिळाली होती.खबरीने दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गायमुख घोडबंदर रोड येथे सापळा लावला.यात आरोपी पटेल अडकला. त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या कडून 242.09 ग्रॅम वजनाचे एमडी अमली पदार्थ असल्याचे समोर आले.चौकशी केली आता सदर अमली पदार्थ विक्री करण्यास तो आला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याला अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम हे करीत आहेत. आरोपीच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे),अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार अजय सपकाळ, हेमंत महाले, गिरीश पाटील, शिवाजी रावते, नंदकिशोर सोनगिरे, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांचे पथकाने केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0