Thane Drug News : नायजेरियनची पुन्हा ड्रग्ज तस्करी; 66.18 लाखांच्या एम.डी (मेफेड्रॉन) सह आरोपी जेरबंद
Thane Police Arrested Drug Dealer : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.
ठाणे :- अंमली पदार्थ विक्री Thane Drug Selling करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच दिले होते.याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे.ड्रग्जच्या तस्करीमध्ये सहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या जॉन फ्रान्सिस उर्फ ओनाह येलबर्ट उर्फ जॉन जेम्स (45 वय) या नायजेरियन आरोपीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. फ्रान्सिस याच्याकडून 66.18 लाखांचे एमडी जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ठाण्यातील शीळ, डायघर, खिडकाळी रोड, देसाई नाका भागात एक नायजेरियन एमडीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, जगदीश गावीत आणि उपनिरीक्षक दीपेश किणी यांच्या पथकाने 12 जानेवारी रोजी देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्कसमोर सापळा लावून जॉन जेम्स याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत 66 लाख 18 हजारांचा 661.8 ग्रॅम वजनाचा एम.डी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ हस्तगत केला. याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.लाखांचे एम.डी जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.त्याला 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.फ्रान्सिसला 12 जानेवारी 2019 रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक किलो कोकेनसह अटक केली होती. याच गुन्ह्यात त्याला सहा वर्षांची शिक्षाही झाली. शिक्षा भोगून तो 13 नोव्हेंबर 2024 रोजी कारागृहातून सुटला. त्यानंतर पुन्हा एम.डीची तस्करी करतांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक केली.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, पोलीस सह आयुक्त, डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ.पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) धनाजी क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, पोलीस उपनिरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार विक्रांत पालांडे, प्रशांत राणे, शिवाजी वासरवाड, अभिजीत मोरे, हरीश तावडे, हेमंत महाले, महेश साबळे,अमोल देसाई,हुसेन तडवी, संदीप भांगरे, पोलीस अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस अंमलदार कोमल लादे यांचे पथकाने केलेली आहे.