मुंबई

Fake Rape Case : बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराचा पर्दाफाश!

Ulhasnagar Fake Rape Case : उत्तर प्रदेशमधील नातेवाईकाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी उल्हासनगर मध्ये रचला कट

बदलापूर :- उत्तर प्रदेश मधील नातेवाईकाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या सन्नी चौहान यांनी कट राचला होता. सन्नी चौहान, खोटी तक्रार दाखल करणारी महिला आणि त्यांच्या साथीदार या टोळी पर्दाफाश बदलापूर पूर्व पोलिसांनी Badlapur Police Staion केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2024 दरम्यान बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महिलेने बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.गुन्हयातील आरोपी अभिषेक सिंग याचे ठावठिकाणाबाबत गुप्त माहिती काढली असता तो लखनऊ, उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेश येथे गेले होते. आरोपी अभिषेक सिंग याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता गुन्हा घडला त्यावेळेस तो लखनऊ या ठिकाणीच असलेबाबत सी.सी.टि.व्ही फुटेज मध्ये दिसुन आले. यावरून नमुद गुन्हयात पोलीसांची दिशाभुल करण्यात्चा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात दिसुन आले.

नेमका काय प्रकार घडला?

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार व तांत्रीक तपासानुसार गुन्हयातील सन्नी चौहान व त्याचे इतर साथीदार यांनी आपसात संगनमत करून सन्नी चौहान याचा उत्तर प्रदेश येथे रहाणारा नातेवाईक अभिषेक सिंग यास बलात्काराच्या खोटया केसमध्ये अडकविण्यासाठी उल्हासनगर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सन्नी चौहान यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र प्रथमेश यादव यास प्रथम अभिषेक सिंग याचे लखनऊ येथील राहते घराच्या परिसरात पाठवुन अभिषेक सिंग याच्च्या नावाने स्नॅपचॅटवर खोटे अकाउंट तयार करून फिर्यादी यांच्या मोबाईलवर चॅटिंग केली. तसेच दुसरा आरोपी भावेश तोतलानी यास अभिषेक सिंग याचे डुप्लीकेट आधार कार्ड देतुन त्याद्वारे भावेश तोतलानी याने लॉज मॅनेजर यास अभिषेक सिंग असलेबाबत भासवून सदर लॉज मध्ये रूम बुक केली. फिर्यादी यांना रूममध्ये बोलाविले व त्यानंतर फिर्यादीने अभिषेक सिंग याच्याविरुध्द बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती असे देखील निष्पन्न झाले आहे. गुन्हयात लखनउ, उत्तर प्रदेश येथील अभिषेक सिंग यास खोटया पध्दतीने गोवण्यासाठी मुख्य आरोपी सनी चौहान व त्याचे इतर साथीदार तसेच फिर्यादी महिलेचा देखील सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे गुन्हयात एकुण दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन गुन्हयात भारतीय न्याय संहिता कलम 336 (2), 336(4), 340(2), 61(2), 3(5), 217, 228, 231, 236, 60, 336(3), 337, 339 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66 (क), 66 (ड),67 (अ) वाढ करण्यात आली आहे. अश्या पध्दतीने गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयाची उकल करण्यात व एका निरपराधी माणसास कायदेशीर कारवाईपासुन वाचविण्यात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यास यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0