ठाणे : डिजिटल चलनाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘ORIS.TEAM, POLAND’ या तथाकथित क्रिप्टो प्रकल्पाचा भांडाफोड झाला आहे! गुंतवणुकीवर आकाशचं आमिष दाखवत नागरिकांची लूट करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणात शिवकुमार खिल्लारे या आरोपीला अटक करण्यात आली असली तरी, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार ‘खुराणा’ हा दिल्लीमध्ये ऐटीनं वावरत असून अद्याप फरार आहे.
“ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी दिल्लीमध्ये खुलेआम फिरतो… मग पोलिसांची नजर कुठं आहे?” असा सवाल जनतेतून होत आहे.
ही फसवणूक इतकी शास्त्रशुद्ध रचण्यात आली होती की ORIS COIN या नावाने वेबसाइट, चॅटग्रुप्स आणि गुंतवणूक योजनांद्वारे लोकांना “क्रिप्टोचा सोन्याचा खजिना” दाखवला गेला. हजारो गुंतवणूकदारांनी लाखो रुपये टाकले — पण परत मिळालं फसवणुकीचं पॅकेज!
या प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत गुन्हा दाखल असूनही, मुख्य सूत्रधार खुराणा याच्या अटकेसाठी अद्याप विशेष पथक नियुक्त झालेले नाही.
“गुन्हा ठाण्यात, सूत्रधार दिल्लीत आणि पोलिस मात्र गप्प — हे नेमकं कोणाच्या दबावाखाली?” असा संशय व्यक्त होत आहे.
सायबर क्राईम विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे. मात्र, गुंतवणूकदारांचा एकच आवाज —
“आमचं डिजिटल सोनं लुटलं गेलं, आता न्याय मिळेल का?”