क्राईम न्यूजठाणे

मध्यवर्ती पोलिसांची मोठी कारवाई ; उल्हासनगर मध्ये सहा किलो गांजा जप्त

Thane CP Ashutosh Dumbare Take Action Against Drug Supplier : मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे हददीतील गुलराज टॉवर, उल्हासनगर-3 या ठिकाणी सुमारे 06 किलो गांजा पोलीसांनी केला जप्त

उल्हासनगर :- पोलीस आयुक्त ठाणे शहर, आशुतोष डूंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ Drug Sealing विक्री करणारे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे व्यक्तीवर Take Action Drug Peddler कारवाई करणे बाबत आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना आदेशीत केले. तसेच अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 4 डॉ. सुधाकर पठारे, तसेच सहा. पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग, अमोल कोळी यांनी पोलीस ठाणे हददीत अत्यंत प्रभावीपणे पेट्रोलींग करुन अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. Thane Crime News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे 05 एप्रिल रोजी मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे व त्यांचे सोबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दत्तू जाधव, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, पोलीस शिपाई वैजिनाथ राख, पोलीस शिपाई बाबासाहेब ढाकणे, पोलीस शिपाई विकास पाटील, पोलीस शिपाई अरविंद पवार असे मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे हददीमध्ये पेट्रोलींग करीत असताना रात्री 8.30 वा.चे सुमारास गुलराज टॉवर परिसरामध्ये शाहू ब्रिज जवळ, रोडवर एक इसम हातात पिशवी घेवून संशयास्पदरित्या जात असल्याचे दिसून आल्याने व पोलीस पथकास पाहताच तो घाई घाईने निघून जावू लागला म्हणून त्याचेवर संशय बळावल्याने सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसम नामे सोमनाथ धर्मा सोनवणे (52 वर्षे) (रा. मु.पो. भोकर ता. जि. जळगाव) यास ताब्यात घेवून त्याचेकडील पिशवीची पाहणी केली असता त्या पिशवीमध्ये 72 हजार रुपये किंमतीचा सुमारे 06 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करुन त्याचे विरोधात मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात अटक करण्यात येवून त्याची न्यायालयातून पुढील 05 दिवस पोलीस कोठडी घेण्यात आलेली असून गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे हे करीत आहेत. Thane Crime News

पोलीस पथक

अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4, डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अमोल कोळी, उल्हासनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, मध्यवर्ती पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सुचनांनुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे व त्यांचे सोबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दत्तू जाधव, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, पोलीस शिपाई वैजिनाथ राख, पोलीस शिपाई बाबासाहेब ढाकणे, पोलीस शिपाई विकास पाटील, पोलीस शिपाई अरविंद पवार यांनी केली आहे. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0