मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : अंमली पदार्थाची हेरगिरी करून पैशाची देवाण-घेवाण करणारे आरोपीला अटक

कक्ष-7 गुन्हे प्रकटीकरण शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपरच्या पथकाने एम. डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आंगडीयास अटक

मुंबई :-ललित पाटील प्रकरणानंतर राज्यात अमली पदार्थ खरेदी विक्रीवर तसेच त्याच्या सेवन करण्यावर पोलिसांकडून कटाक्ष लक्ष असून मोठ्या कारवाया आतापर्यंत पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी अनेक कारखाने या प्रकरणानंतर राज्यातील उध्वस्त केले आहे. पोलिसाचा अमली पदार्थ सेवनातून खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच पैशाची हिरकरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्याचे सत्र चालू केले आहे. कक्ष-7, गुन्हे प्रकटीकरण शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपर, मुंबईच्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे 16 फेब्रुवारी रोजी सापळा रचुन एका महिला आरोपीस चेंबुर-सांताक्रुझ लिंकरोड, कुर्ला (प), मुंबई येथुन एकुण 641 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थाचे व्यवसायामधुन मिळविलेली रोख रक्कम 12.20 लाख रूपये व 25 ग्रॅम (कि.अं.रु. 1 लाख 50 हजार 420 ) सोन्याच्या दागिण्यांसह अटक करण्यात आली. सदरबाबत कुर्ला पोलीस ठाणे येथे वि.स्था.गु.र.क्र. कलम 8 (क), 22 (क), 29 अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा मा. वरिष्ठांवे आदेशान्वये पुढील तपासासाठी कक्ष-7 कार्यालयाकडे घेण्यात आला.

नमुद महिला आरोपीकडे केलेल्या चौकशीत तीने सदरचा एम. डी. हा अंमली पदार्थ मिरा रोड येथील तीच्या ओळखीच्या इसमाकडुन आणला असल्याचे सांगितले. त्यावरुन कक्ष-7 चे पथकाने एका पुरुष आरोपीतास मीरा रोड येथुन 03 कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ (अं.कि.रू. 6 कोटी) व रू. 3.68 लाख रोख रक्कमेसह ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा एम. डी. हा अंमली पदार्थ सुरत, गुजरात येथे राहणाऱ्या 02 व्यक्ती दिल्याचे सांगितल्याने सदर इसमांना सुरत, गुजरात येथुन अटक करण्यात आली.

गुन्ह्याचा तपास चालु असताना आरोपीतांकडे व साक्षीदरांकडे केलेल्या चौकशीवरून तसेच तांत्रिक तपासाव्दारे आणि पोलीस पथकाने वेगवेगळ्‌या ठिकाणी पाळत ठेवुन प्राप्त माहितीच्या आधारे 25 मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाणे हद्दीत इरळी या गावात धडक कारवाई करून एम.डी. हा अंमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याचा शोध घेऊन एकूण 122.500 कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (अंदाजे किंमत 245 कोटी) तसेच एम. डी. बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य व गुन्हयात वापरलेले वाहन ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये एकुण 06 पुरूष आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. नमुद गुन्हयांमध्ये अद्यापपर्यंत एकूण

10 पुरुष आरोपी व 01 महिला आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीताकडे केलेला तपास व तांत्रिक तपासामध्ये त्याने अंमली पदार्थ विक्रीतुन कमावलेले एकुण 3 कोटी 46 लाखा 68 हजार 200 रूपये भिवंडी रोड, जिल्हा-ठाणे येथुन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे पैसे अंगडीयाच्या मार्फतीने ज्या व्यक्तींना एम.डी. या अंमली पदार्थाचा पुरवठा करण्यात आला त्यांनी पाठविले असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाल्याने पैसे एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्रेत्यांकडुन घेऊन मुख्य आरोपीतास देणाऱ्या हवाला व्यवसायीक जेसाभाई मोटाभाई माली यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

अशा रितीने अंमली पदार्थाची निर्मिती व विक्री करणाऱ्या टोळीसाठी पैशांच्या देवाण घेवाणीचे काम करणाऱ्या हवाला व्यवसायीकास अटक करण्यात कक्ष-7 चे पथकास यश आले आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती Deven Bharti, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना Shashikumar Meena, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-7, गुन्हे प्रकटीकरण शाखा घाटकोपर, मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी (कक्ष-५), पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, पोलीस हवालदार राजेंद्र शिंदे, प्रमोद जाधव, पोलीस शिपाई जितेंद्र पाटील, दिलिपराव राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0