Thane Crime News : घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
Thane Crime News Thane CP Ashutosh Dumbare Take Charge Against Burglary : चोरी करण्यासाठी विमानाने करायचा प्रवास, 62 लाख 24 हजार रू. किमतीचे 889 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करून 22 गुन्हयांची
ठाणे :- पोलीस आयुक्त, ठाणे आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हयात झालेली वाढ लक्षात घेता घरफोडी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शिवराज पाटील यांनी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.
सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे ठाणे यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई भावेश घरत, पोलीस शिपाई अमोल इंगळे यांचे विशेष पथक स्थापन केले.
पथकाने केले तपासामध्ये नारपोली पोलीस स्टेशन, भिवंडी गुन्हा नोंद क्रमांक भा. दं. सं. कलम 454,380 या गुन्हयात घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम, रा. सामरोली गांव, चौधरी बाजार, आसाम याचेबाबत माहिती प्राप्त झाली. सदर आरोपी यापुर्वी नवी मुंबई येथे राहण्यास होता. त्याचेविरूद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परंतु सद्या तो फक्त चोरी करण्याकरीता विमानाने प्रवास करून मुंबई येथे येतो व चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने प्रवास करून आसाम व नागालैंड रा राज्यात लपण्यासाठी पळून जावुन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्यांचा राहण्याचा कोणताही ठोस पत्ता नव्हता तसेच मोबाईल फोन देखील वापरत नव्हता, तसेच त्याची ओळख लपविण्याकरीता विग घालत होता. Thane Crime News
नमुद आरोपी हा रमजान महिना सुरू असल्याने त्याचे आसाम राज्यातील मुळ गांवी आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना प्राप्त झाली. सदर प्राप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस शिपाई भावेश घरत यांनी आरोपी याचे मुळ गांवचे परिसरात सलग 05 दिवस वेषांतर करून मोटर सायकलवर फिरून आरोपी याचेबाबत माहिती प्राप्त करून त्यास मुराजर पोलीस स्टेशन, ता. जि. होजाई, आसाम यांच्या मदतीने ताब्यात घेतले.आरोपी हा अटक टाळण्याचे हेतुने त्याचे राहते घराचे खिडकीतुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याचे पायास दुखापत झाली असुन सदर दुखापतीचा फायदा घेवुन त्याने तपासामध्ये Thane Crime News
सहकार्य करीत नव्हता असे असतानादेखील अटक आरोपी याचेकडे कौशल्याने तपास करून त्याचा ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई शहरातील एकुण 22 गुन्हयातील सहभाग निष्पन्न केला अद्भुत नमुद गुन्हयात चोरीस गेलेले एकूण 62 लाख 24 हजार रू. किमतीचे 889 ग्रॉम
वजनाचे सोन्याचे दागीने हत्तगत करण्यात आलेले आहेत.
पोलीस पथक
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक 2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, धनराज केदार, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र चौधरी, निसार तडवी, हनुमंत वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोलीस हवालदार सुनिल साळुंखे, देवानंद पाटील, मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील, शाबीर शेख, किशोर थोरात, शशीकांत यादव, सचिन साळवी, वामन भोईर, राजेंद्र राठोड, प्रकाश पाटील, सचिन सोनावणे, अमोल देसाई, महिला पोलीस हवालदार श्रेया खताळ, माया डोंगरे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, उमेश ठाकुर, जालींदर साळुंके, नितीन बैसाणे, रविंद्र साळुंके यांनी केली आहे.