मुंबई

Thane Crime News : ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून कारवाई आदेश ; सराईत आरोपींच्या विरोधात बडगा

सराईत गुन्हेगार इसम नामे इरफान गुलाब शेख यांच्यावर एमपीडीए कायदयार्गत केले स्थानबध्द

ठाणे :- आगामी लोकसभा निवडणुक 2024 निर्भिड व शांततापुर्वक पार पाडण्यासाठी सदर इसमावर ठोस प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक होते त्याकरीता सदर इसमास स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी तयार करुन तो सुरेश वराडे, सहा पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग, डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-4, उल्हासनगर, दत्तात्रय शिदि, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना सादर करण्यात आला होता.

अंबरनाथ पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर इरफान गुलाब शेख, (28 वर्षे), राह-बांद्रापाडा, अंबरनाथ पं. हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या गुन्हेगारी कारवायामुळे अंबरानाथ शहरात दहशत पसरली होती. तो दहशत माजवून, आपले गुंड प्रवृत्तीने अंबरनाथ मध्ये लोकांना दमदाटी करत होता त्यांचेविरूध्द खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, गर्दी करणे, दुखापत, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे अशा प्रकारचे 29 गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची त्यास सवय जडलेली होती. त्याचे विरूध्द कोणीही सर्वसामान्य नागरीक तक्रार देण्यास धजावत नव्हता. मागील तीन/चार वर्षात त्याच्या गुन्हेगारी कारवाया मोठया प्रमाणात वाढलेल्या होत्या. तो आर्मीनावर सुटताच पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत होता.

19 मार्च रोजी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी सदर प्रस्तावास मंजुरी देवुन नियोजित स्थानबंध्द इसम नामे इरफान गुलाब शेख, (28 वर्षे) राह-वांद्रापाडा, अंबरनाथ प. यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टी गुंड, हातभ‌ट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन 1981 व सुधारीत अधिनियम सन 1996 चे कलम 3(1) (MPDA), मधील तरतुदी नुसार “धोकादायक व्यक्ती’ म्हणुन १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश निर्गमित केले. सदरचे आदेश प्राप्त होताच. नियोजित स्थानबध्द इसम यास 20 मार्च रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पोलीस हवालदार विशे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस शिपाई निरगुडा यांनी शिताफीने ताब्यात घेवुन कायदेशीर प्रकिया पुर्ण करुन त्यास आज (21 मार्च) रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे 1 वर्ष कालावधीसाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

पोलीस पथक

आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशान्वये ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, सुरेश वराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग, अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त, उल्हासनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ कळसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पोलीस हवालदार विशे व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0