ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : सेल्समन याने मौजमजा करण्यासाठी दुकानात केली चोरी

ठाणे :- नौपाडा पोलीस ठाण्यात 25 मार्च रोजी फियादी नामे सुरेश पारसमल जैन, (59 वर्षे) व्यापारी यांनी फिर्याद दिली की, नोव्हेंबर 2023 ते 9 मार्च 2024 या कालावधीत फिर्यादी यांचे सोन्याचे दुकानामध्ये मध्ये सेल्समन म्हणुन काम करणारा इसम नामे राहुल जयंतीलाल मेहता, गावदेवी मैदानाजवळ, ठाणे याने आमचा विश्वासघात करुन त्याचे ताब्यात विश्वासाने विक्रीकरीता दिलेले दागिन्यांपैकी 38 छोटे व मोठे सोन्याचे हार, सोन्याचे 24 जोडी कर्णफुले, 03 सोन्याच्या चैन, 05 सोन्याचे बाजुबंद बाजुबंद एकुण 70 दागिने त्याचे वजन 1599.470 ग्रॅम व त्याची एकुण किंमत 1 कोटी 5 लाख 55 हजार 766 असे असलेले सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन हेतुपरस्सर अपहार केला आहे. फिर्याद दिल्याने नौपाडा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 408 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. Thane Crime News

गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे हे करीत असुन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तपासी अधिकारी यांनी तपास वालु केला असता सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे राहुल मेहता याचा त्याचे राहते घरी तसेच कामाचे ठिकाणी व नातेवाईकांडे शोध घेतला असता सदर आरोपी हा दिनांक 08 मार्चपासुन कामावर येत नसल्याचे निष्पन्न झाले तसेच दिनांक 15 मार्च रोजी आरोपीची पत्नी हिने त्याचे हरिवले बाबतची नौपाडा पोलीस स्टेशन मानव मिसिंग 2024 अन्वये तक्रार नोंद केली होती. यावरून निषन्न झाले की, राहुल मेहता याने चोरी करून ती चोरी उघड होईल या भितीने तो मोबाईल फोन बंद करून निघुन गेलेला आहे. Thane Crime News

गुन्हयातील मुख्य आरोपी याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची माहीती घेतली असता आरोपी हा फरार असतानाचे काळात तो मिरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळया ठिकाणी फिरत होता व पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता. आरोपीच्या नातेवाईक, पत्नी व मित्र यांचे हालचालींवर लक्ष ठेवुन आरोपीचा शोध घेत असताना 26 मार्च रोजी आरोपी हा त्याची मैत्रीणीस मिरा रोड येथे भेटण्यासाठी येणार असल्याची पोलीसांना माहीती मिळाली त्यावरुन पोलीसांनी मिरा रोड परिसरात सापळा रचुन आरोपी नामे राहुल जयंतीलाल मेहता यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयाकामी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची दिनांक 30 मार्च रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. Thane Crime News

आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यास दारु पिणे व मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने राजवंत ज्वेलर्स या ठिकाणी कामावर असताना गरज असेल तेंव्हा दुकानातुन सोन्याचे दागिने चोरून ते त्याचे ओळखीचे ज्वेलर्स यांना विक्री करुन त्यामधुन आलेल्या पैश्यातुन तो मौजमजा करायचा. प्रथम चोरी केलेले दागिने हे मालकाच्या लक्षात न आल्याने आरोपीने मोठ्या प्रमाणात सोने चोरी करुन परराज्यात जावुन स्थायिक होण्याचा त्याचा मनसुबा होता. Thane Crime News

अटक आरोपीकडुन तपासा दरम्यान चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यापैकी 26 नेकलेस/हार, 21 कानातील कर्णफुले व 06 गळयातील चैन असे सुमारे 62 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 900 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. उर्वरित दागिन्यांबाबत आरोपीकडे तपास चालु आहे. Thane Crime News

पोलीस पथक

आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम. विभाग विनायक देशमुख, सुभाष बुरसे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील, दत्तात्रय लोंढे, पोलीस हवालदार गायकवाड, पाटील, देसाई, रांजणे, गोलवड, तडवी, विरकर,पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई कांगणे, तिर्थकर, यांनी केलेली आहे. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0