Thane Crime News : तंबाखूजन्य पदार्थ वर धाड, चाळीस लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त
•रजनीगंधा, राजनिवास, राजश्री, विमल या तंबाखूजन्य पदार्थावर पोलिसांची कारवाई
ठाणे :- महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असताना मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थाचे बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ठाण्यामध्ये अशाच प्रकारे एक बेकायदेशीर टेम्पो वाहतूक करताना पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. जवळपास 40 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
(04 एप्रिल) रोजी 12.25 गुन्हे शाखा, घटक-1, ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक मारकड, पोलीस शिपाई सुरळकर व त्यांचे पथकास मिळालेल्या माहितीवरून, कळवा ब्रिज, साकेतकडे जाणा-या रोडच्या कोप-यावरील सार्वजनिक रोडवर, ठाणे पश्चिम येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी आरोपी रामक्रित लट्टु यादव, (40 वर्षे) व्यवसाय-चालक, रा.सुरत, गुजरात राज्य याने आयशर कंपनीचा टेम्पो या वाहनातुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थ रजनीगंधा पान मसाला, राजनिवास पानमसाला, राजश्री पानमसाला, विमल पानमसाला, पुकार पानमसाला व सुगंधी तंबाखु असा टेम्पोसह एकुण 41 लाख 87 हजार 234 रूपये किमंतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द भा.द.वि. कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2),27,3,26(2)(iv),30(2)(अे) सह शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी रामक्रित लट्टु यादव, (40 वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारकड हे करीत आहे.