Thane Crime News : तेल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Thane Crime News kalwa police Arrested Criminal : कळवा पोलीस ठाण्याचे उल्लेखनिय कामगिरी ; खाद्यतेलाची चोरी करणाऱ्या टोळीस शिताफीने अटक तात्काळ गुन्हा उघड
ठाणे :- कळवा पोलिसांकडून तेल चोरी करणाऱ्या टोळीस अटक करून चोरांकडून गुन्ह्याचे उलघाडा केला आहे. समीर सलीम सिध्दीकी, (31 वर्षे), व्यवसाय खाण्याचे तेलाचे व्यापारी,मलीक टॉवर, तन्वर कॉम्प्लेक्स कौसा मुंब्रा यांच्या मालकीच्या गणेश ऑईल डेपो कंपनी, साईनाथनगर, कळवा या कंपनीतुन 98 लाख 34 हजार 440 रु कि.चा त्यामध्ये सुर्यफल, पामतेल, अशा विविध खाद्यतेलाचे डबे फिर्यादी यांच्या समंतीशिवाय लबाडीच्या इरादयाने वेळोवेळी चोरी करून नेले म्हणुन गुन्हा नोंद झाला आहे. दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस स्टेशन भा द वि स कलम 380,381,411,34 प्रमाणे दि. 24 एप्रिल 2024 रोजी गुन्हा नोंद आहे.
गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सक्त आदेश दिल्याने गुन्हयाच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस स्टेशन अशोक उतेकर यांनी पोलीस निरीक्षक, गुन्हे अनिल गायकवाड, तपासिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव व गुन्हे प्रकटीकरण पथकास यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सक्त सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडे,पोलीस हवालदार महाडिक व स्टाफच्या मदतीने तात्काळ गुन्हयातील आरोपी यांच्याबाबत काहिएक माहिती नसताना तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपीबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच कौशल्यपुर्वक माहिती प्राप्त करून फिर्यादी यांच्या ऑईल कंपनीत काम करणारे आरोपी नामे 2) अनील लक्ष्मण गायकर (30 वर्षे) राह गायकर निवास, गावदेवी रोड, चरणीपाडा, कौसा मुंब्रा, 2) शौकतअली शराफतअली खान, (49 वर्षे), राह छोटा छत्रंमंजिल, पीपलकाहाता, लखनउ, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदार आरोपी नामे 1) अजय सियाराम गुप्ता, (23 वर्षे) धंदा नोकरी,( रा.ठी. सियाराम चाळ, रूम नं. ०१, चर्नीपाडा, बायपास, कौसा, मुंब्रा,)
2) राहूल प्यारेलाल गुप्ता, (29 वर्षे) मुंब्रा, जि.ठाणे यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयात चोरी केलेल्या मुद्देमाल विक्री करून त्यामधुन आलेल्या रक्कमेतुन मुख्य आरोपी नामे अनिल गायकर याने मारूती सुझुकी कंपनीची ग्रॅण्ड विटारा ही खरेदी केल्याचे सांगितले. तसेच त्याच्या व त्याच्या नातेवाईक यांच्या नावावर रक्कम जमा केल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी अ.नं. 1 व 2 यांना दि.24 एप्रिल 2024 रोजी तात्काळ व आरोपी 3 आणि 4 यांना 30 एप्रिल 2024 रोजी अटक करून त्यांच्याकडुन 27 लाख 80 हजार 561 रूपये कि.चा. मुद्देमालामध्ये कार व बँकेतील ठेवी हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणून उल्लखेनिय कामगिरी केलेली आहे.
पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वचर चव्हाण , सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर,अपर पोलीस आयुक्त, विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, सुभाषचंद्र बुरसे, ठाणे, सहायक पोलीस आयुक्त, उत्तम कोळेकर , कळवा विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे करण्यात आलेली आहे.
पोलीस पथक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी पोलीस निरीक्षक, गुन्हे अनिल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, पोलीस हवालदार प्रदिप शिंदे, संदिप महाडिक, प्रविण काळे, अनिल खुस्पे, पोलीस नाईक अमित सपकाळ, पोलीस शिपाई स्वप्नील खपाले, पोलीस शिपाई महादेव हजारे यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गुन्हयातील आरोपीबाबत तांत्रीक माहितीच्या आधारे त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन सदरची उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
गुन्हयातील मुख्य आरोपी
1) मो. आमीर शेख
2) राशिद शेख,
3) अरशद उर्फ अरबाज शौकातअली खान, सर्व रा. उत्तरप्रदेश यांचा शोध चालु आहे. गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव हे करीत असुन तपास चालु आहे.