Thane Crime News : डोंबिवली मधील घटना ; सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम याची चोरी
Dombivli Crime News- विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध
डोंबिवली :- शहरात चोरीची घटना सातत्याने समोर येत असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत एका घरामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरट्याने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी यांनी डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. Thane Crime News
बाबूलाल आसकर डागा (52 वर्ष), हे डोंबिवली पश्चिम बंगाल येथे राहत असून 24 फेब्रुवारी च्या दुपारच्या दरम्यान एक ते तीन वाजेच्या दरम्यान बाहेर गेले असता त्याच्या घरातील दरवाजेला असलेल्या कुलूप तोडून आणण्यात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख 56 हजार किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केले आहे. फिर्यादी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आंधळे हे करत आहे. Thane Crime News