Thane Crime News : बँक केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक
•Thane Cyber Crime News डिजिटल भामट्यांकडून लाखोंचा गंडा, बँक केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक
ठाणे :- डिजिटल भामट्यांकडून प्रारंभी तुमचा माेबाइल क्रमांक शाेधून काढला जाताे. त्यानंतर तुमच्याशी गाेडी-गुलाबीने बाेलून बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा क्रमांक, माेबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला जाताे. तुम्हाला विविध याेजनेचे, अधिकच्या पैशाचे आमिष दाखविले जाते. तुमच्या खात्यात अमुक अमुक याेजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत, अशी बतावणी करून फसविले जाते. या आमिषाला बळी पडून अनेक जण आपल्या बँक खात्याशी, एमटीएमशी, क्रेडिट कार्ड संबंधित माहिती देतात आणि क्षणात खात्यावरील पैसे परस्पर काढले जातात. अशा घटना माेठ्या प्रमाणावर घडत असल्याचे समाेर आले आहे. अशीच एक घटना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांच्या हद्दीत घडून आली आहे. बँक केवायसी अपडेटच्या नावाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामध्ये डिजिटल भामट्यांनी जवळपास 8.30 लाखोंचा गंडा घातला आहे.
फिर्यादी पुष्कर रघुनाथ शेजवलकर, ठाण्याच्या मखमली तलाव येथे राहणारे असून त्यांना व्हाट्सअप वर बँकेचे केवायसी अपडेट नसल्याचे खोटे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्यासाठी खोटा नंबर देऊन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर डेबिट कार्ड वरचे संपूर्ण माहिती फिर्यादी आणि भरली असता त्यानंतर लबाडीने त्यांच्या खात्यातील आठ लाख तीस हजार रुपये रक्कम फ्रॉड ट्रांजेक्शन करून ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यावर वळवण्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात फिर्यादी पुष्कर यांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि 2023 चे कलम 318 (4),319(2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार हे करत आहे.