Thane Crime News : फसवणूक पर्दाफाश ; कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
- पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून मोठी कारवाई ; विदेशी चलन कमी किंमतीत देतो असे सांगून हसून करणाऱ्या 4 पुरुष आणि 1 महिलांना पोलिसांनी केले जेरबंद
ठाणे :- आंतरराष्ट्रीय चलन कमी दरात उपलब्ध करून देतो असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील चार पुरुषांना एक महिलेला अटक केली आहे. ही टोळी मुंबई, नवी मुंबई ,ठाणे या परिसरात लोकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या असून या टोळीच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Thane Crime News
देवनार पोलीस ठाणे येथे भादवी कलम 420, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी काढायचा राबवळी परिसरातील महालक्ष्मी मंदिर समोर साकेत रोड येथे येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे पोलीस हवालदार शिंपी, भोसले, पावसकर यांनी सापळा रचून पाच आरोपींना अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी नावे
- हसन मुसा शेख (29 वर्ष)
- वहावली अमीर अली खान (26 वर्ष)
- हैदर नयान शेख (32 वर्ष)
- माजीदअली ताहीर हुसेन (39 वर्ष)
- फरजान उर्फ काजली अमीरउल्ला शेख (39 वर्ष)
या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुली केले आहे तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐकून एक लाख 80 हजार 200 किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी यांच्यावर देवनार सह मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे दोन्ही पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Thane Crime News
पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare, पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हा पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध -2 गुन्हे शाखा ठाणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस,सुनील तारमळे,पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष तावडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, पोलिसा वर्धा सचिन शिंपी, गणेश गुरसाळे, भोसले, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, निलेश जाधव, महिला पोलीस शिपाई, मयुरी भोसले, तानाजी पाटील, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. Thane Crime News