Thane Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
• ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई जवळपास 23 लाखहुन अधिक किंमतीची अवैध दारू जप्त
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुकांचे मतदान संपन्न झाले आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात राज्यात मतदान 13 मे आणि 20 मे असे होणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी यांसारख्या मोठ्या शहरात 20 मे ला मतदान होणार आहे. मतदानापूर्वी निवडणूक आयोगाकडून खबरदारी म्हणून काटेकोरपणे सर्व नियमाचे पालन प्रशासनातील सर्व विभागाकडून केले जात आहे. यंदाची निवडणुकी अतिशय गंभीर स्वरूपाची असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटी नंतर राज्याच्या राजकारणातील वातावरण अतिशय तापले असून या यंदाच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करत बेकायदेशीर रित्या धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सत्र हाती घेतले आहे. ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात धडक कारवाईकरण जवळपास 23 लाख 55 हजार 210 रुपये किंमतीची अवैध दारूची भट्टी उध्वस्त केले आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.