क्राईम न्यूजनाशिकनाशिक

Thackeray Group : ठाकरे गटाच्या नाशिक जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस, ठाकरे गटाच्या त्या नेत्याच्या अडचणीत वाढ

Nashik Thackeray Group : नाशिक जिल्हा प्रमुख ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून तडीपारची नोटीस, दाऊदच्या साथीदाराशी संबंध असल्याचा आरोप

नाशिक :- राज्यात लोकसभेचे निवडणूक Lok Sabha Election चालू आहे. ठाकरे गटाचे अनेक नेत्यांना सत्ताधाऱ्यांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्याचे उद्धव ठाकरे Nashik Thackeray Group गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर Sudhakar Badgujar  यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारची Tadipar Notice नोटीस काढली आहे. मात्र ही नोटीस स्वीकारण्यास सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच सलीम कुत्ता याच्या पार्टीत डान्स केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार हल्ला चढवला होता. आता याच प्रकरणात सुधाकर बडगुजर Sudhakar Badgujar  यांना नोटीस काढली असल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळाची चांगली चर्चा रंगली आहे. Nashik Lok Sabha Latest News

ठाकरे गटाच्या नेत्याचा दाऊदच्या जवळील साथीदारशी संबंध

दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी म्हणून सलीम कुत्ता ओळखला जातो. सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजर यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. सलीम कुत्ता याच्या नाशिक येथील फार्म हाऊसवर लग्न समारंभात सुधाकर बडगुजर हे सहभागी झाले होते. या लग्न समारंभात त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले या प्रकरणी एसआयटी चौकशीची स्थापना करून याची सविस्तर चौकशी करण्याचे आश्वासन त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता याच प्रकरणात त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. Nashik Lok Sabha Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0