ठाणे

Thane Crime News : मनाई आदेश भंग ; तडीपार आरोपीला केले अटक

•आरोपीला 18 महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यासह 3 जिल्हातुन केले होते हद्दपार

ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. ठाण्यामध्ये राजन विचारविरुद्ध नरेश मस्के शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राहणार असून पोलिसांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. श्रीनगर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला वागळे इस्टेट परिसरातून अटक केली आहे. Thane Crime News

आरोपी राकेश दामोदर जाधव (34 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5, ठाणे यांनी ठाणे, जिल्हासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई या हद्दीतुन 18 महिन्याच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 26 जानेवारी 2024 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 ठाणे यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 30 एप्रिल रोजी रात्री 11.40 वा. चे सुमारास, श्रीनगर पोलिसा ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी राकेश जाधव यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार मुकेश इघे हे करीत आहेत. Thane Crime News

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts