ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : बिहारमधील बंदूकधारी तरुणाला ठाण्यात अटक:पोलिसांना मोठे नेटवर्क असल्याचा संशय

ट्रेडिं घटना : ठाणे पोलिसांनी लोडेड पिस्तुलासह परराज्यातील तरूणाला पकडले

ठाणे :- बेकायदेशीर आहे त्या बंदूक बाळगणाऱ्या उत्तर प्रदेश मधील तरुणाला ठाण्यातील तीन हात नाका परिसरातून वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांनी संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागोपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

•वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी ; तरुणाकडे 2 गावठी कट्टा,4 मॅगझीन,4 जिवंत काडतुसे जप्त

वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-5 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अहिरे पोलीस हवालदार निकम 23 मे 2024 रोजी दुपारी 1.15 मि‌.सुमारास तीन हात नाका वागळे इस्टेट या परिसरातून एका तरुणाला अटक केली. तरुणाची विचारपूस केली असता हा तरुण बिहार राज्यातील मधील मझवालीया येथे राहणारा असून त्याचे नाव धनंजयकुमारसिंग तारकेश्वर सिंग (24 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी धनंजयकुमारसिंगला
ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 2 गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल (अग्नीशस्त्र), 4 मॅगझीन, 4 जिवंत काडतुस, विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0