Thane Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची मोठी कारवाई ; कार वॉशिंग व्यवसाय बंद चालू करण्यासाठी राज्य बीमा निगम अधिकारी यांनी मागितली लाच
•लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सामाजिक सुरक्षा अधिकारी, सहाय्यक निदेशक यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले
ठाणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना मिळालेल्या तक्रारीवरून राज्य विमा निगम विभागाचे सामाजिक सुरक्षा अधिकारी रवीकुमार तुकाराम तेलवडे आणि धरिंद्र सतेंद्र मिश्रा सहाय्यक निदेशक यांना 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहाथ पकडले आहे.
यातील तक्रारदार यांचा कार वॉशिंग यांचा व्यवसाय बंद झालेबाबत त्यांनी राज्य बीमा निगम कार्यालय ठाणे यांना न कळविल्याने व कर्मचाऱ्याचा विमा वेळोवेळी न भरून, शासनाचे नुकसान केल्याने राज्य विमा निगम ठाणे कार्यालयाकडुन दंड व व्याज असे एकुण 7 लाख 69 हजार 104 रूपयाचा दंड आकारून, नोटीस देण्यात आल्याने, दंड व कारवाई न करणेसाठी यातील रवीकुमार यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 5 एप्रिल रोजी दोन लाख रूपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती प्रथम पन्नास हजार व दहा एक दिवसानंतर राहीलेले पन्नास हजार असे एकुण एक लाख रूपयाची मागणी करून, पैकी पन्नास हजार रूपयाचा पहिला लाचेचा हप्ता स्वतःसाठी व वरीष्ठ अधिकारी यांचेसाठी स्विकारून, त्याचे वरीष्ठ अधिकारी धीरेन्द्रकुमार यांना फोनवरून तक्रारदार यांची लाचेची रक्कम 50 हजार रूपये स्विकारले असले बाबत सांगितले असता, धीरेद्रकुमार यांनी एक लाख तक खिच असे बोलुन, स्विकारलेली लाचेची रक्कम त्यांच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात बोलावुन, लाचेच्या रकमेमध्ये वरिष्ठ अधीकारी धीरेद्रकुमार यांनी देखील सहभाग दर्शवुन प्रोत्साहन दिल्याचे निष्पन झाल्याने दोन्ही अधिकारी यांना 5 एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 2018 सन 1988 कलम 3,7 अ 12 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत अधिकारी मार्गदर्शक
सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.