महाराष्ट्र

त्यांचे स्वागत रेड कार्पेटवर करू…; संजय शिरसाठ

Sanjay Shirsat Meets Raj Thackeray Discussion Mahayuti Shivsena : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट,एकतास चर्चा

मुंबई‌ :- शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ Sanjay Shirsat यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली आहे.एकतास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात, असे शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. Sanjay Shirsat Meets Raj Thackeray

दरम्यान संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी दिल्ली दौरा करत थेट अमित शहांची देखील भेट घेतली होती. मात्र, मागील आठवड्यापासून ही चर्चा थांबली असतानाच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट थेट राज ठाकरेंच्या भेटीला पोहचल्याने पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. Sanjay Shirsat Meets Raj Thackeray

आजच्या बैठकीत मी कोणताही प्रस्ताव वगैरे आणलेला नाही. असे प्रस्तावाचे काम वरिष्ठ पातळीवर होतात. माझ्यासारख्या मार्फत एखादा प्रस्ताव जाईल याची कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या भेटीत फक्त चहा आणि जुन्या आठवणींवर गप्पा झाल्या. तसेच राज ठाकरे यांना मी पहिल्यापासून सांगतो साहेब तुम्ही यायला पाहिजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार आहोत. राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास नक्कीच महायुतीला याचा फायदा होणार आहे. महायुतीची आणखी ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील असे शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांनी अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसाठी बरीच विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांचे या उमेदवारीच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कुठलेही मतभेद नाहीत. कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. आम्ही सर्व मिळून श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जे काही दुसरे रुसवे फुगवे असतील, जे काही गैरसमज असतील ते वरिष्ठ नेते एकत्र बसवून मिटवण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रामदास कदम यांना आता राजीनामा देण्याची गरज नाही. रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0