Thane Crime News : आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक
•पाच किलो 48 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या एकाला ठाण्यात गुन्हे शाखेकडून अटक,व्हेल माशाची उलटी जप्त
ठाणे :- आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-1 यांनी अटक केली. नितीन मोरेलू (52 वय) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पाच किलो 48 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली आहे. ही व्हेल माशाची उलटी पाच कोटी रुपयांची असल्याचे पोलिसांकडून अंदाज वर्तवला जात आहे.
ठाण्यातील साकेत रोड परिसरात एकजण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट-1 पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेले गोपनीय माहितीच्या आधारे साकेत कॉम्प्लेक्स कडुन क्रिक नाक्याकडे येणान्या रोडवर, राबोडी, ठाणे याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी नितीन याला ताब्यात घेतले.पोलीस पथकांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे व्हेल माशाच्या उलटीचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी आरोपी विरूध्द राबोडी पोलीस ठाणे येथे वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,44,48,49बी, 57,51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापुरे, दयानंद नाईक, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस नाईक बडगुजर, पोलीस हवालदार शशिकांत सावंत, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-1. ठाणे, यांच्या पथकाने केली आहे.