Thailand Cyber Fraud News : ‘सायबर गुलामी’च्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुंबईत अटक

Thailand Job Fraud Latest Crime News : थायलंडमध्ये नोकरीच्या आमिषाने नेऊन लाओसमध्ये केली फसवणूक; खंडणीसाठी पासपोर्टही जप्त
मुंबई :- नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना परदेशात नेऊन ‘सायबर गुलामी’ करण्यास भाग पाडणाऱ्या एका रॅकेटचा Mumbai Police Busted Cyber Fraud पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी Mumbai Police या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीने थायलंडमध्ये डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाओसमध्ये नेले आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून खंडणी आणि फसवणुकीचे कामकाज करून घेतले. Mumbai Police Latest Crime News
अँटॉप हिल येथील एका तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी सलमान मुनीर शेख याच्याशी ओळख झाली होती. शेखने त्याला थायलंडमध्ये एका कंपनीत दरमहा 70 हजार रुपये पगाराची डेटा एन्ट्रीची नोकरी ऑफर केली. यावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्याच्या मित्राने व्हिसा व तिकिटासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये सलमानला दिले.
लाओसमध्ये अडकवून पासपोर्ट जप्त
त्यानंतर आरोपी सलमानने एकूण 5 तरुणांना घेऊन थायलंडमधील बँकॉक येथे नेले. तेथून एका चिनी महिलेच्या मदतीने त्यांना कारमधून लाओस या देशात नेण्यात आले. लाओसमधील एका कॉलसेंटरमध्ये तरुणांचे पासपोर्ट जमा करून घेण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या देशांतील नागरिकांना व्हॉट्सॲप, फेसबुक व इंस्टाग्रामवरून संपर्क साधून फसवणूक व खंडणीचे काम करण्यास भाग पाडण्यात आले. तसेच, भारतात परत सोडण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून 20,000 चिनी युआनची खंडणी मागण्यात आली.
पासपोर्टवरील पत्ता बदलून लपलेल्या आरोपीला अटक
फिर्यादीने खंडणी देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर आरोपीने आणखी दोन तरुणांना लाओसमध्ये बोलवून त्याला सोडून दिले. त्यानंतर फिर्यादीने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पासपोर्टवरील पत्ता बदलून नयानगर, मिरारोड येथे लपून बसलेल्या आरोपी सलमान मुनीर शेखला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जर नोकरीची ऑफर थायलंड, कंबोडिया, म्यानमार किंवा लाओस या देशांमधून येत असेल, तर संबंधित कंपनीच्या खरेपणाची खात्री करा.
नोकरीसाठी भरती करणाऱ्या एजंटच्या परवान्याची आणि प्रामाणिकपणाची तपासणी करावी.
केवळ टुरिस्ट व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हलवर नोकरी स्वीकारू नये, कारण ही सायबर गुलामीची फसवणूक असू शकते.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी अशा फसवणुकीचे बळी ठरले असेल, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा भारतीय दूतावासाशी संपर्क साधा.
सायबर फसवणूक झाल्यास 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करावी. Mumbai Police Latest Cyber Fraud News


