Taloja MIDC Development : तळोजा MIDC चा पिता-पुत्रांनी विकास? एमआयडीसीची प्रगती का खड्ड्यात?
Taloja MIDC Development : माजी आमदार हनमंतराव बोंबाडे पाटील यांचे पुत्र दीपक बोंबाडे पाटील तळोजा MIDC चे उपअभियंता, पिताच्या पावलावर पुत्राचे पाऊल!
पनवेल जितिन शेट्टी :- “तळोजा MIDC चे उपअभियंता दीपक बोंबाडे पाटील, माजी आमदार हनमंतराव बोंबाडे पाटील यांचे सुपुत्र, तुम्हाला मानलंच पाहिजे! तुम्ही MIDC क्षेत्राला खरंच ‘प्रगतीच्या’ दिशेने नेलंय—फक्त या प्रगतीमध्ये गट्टर नाले चोक, पाणी रस्त्यावर, आणि प्रदूषण नक्कीच वाढलंय. Taloja MIDC Development MIDC च्या नियमांचं पालन करणे? ते तर तुमच्यासाठी जणू काही विनोदच आहे! गट्टार नाले यांचे साईट सर्व्हे, योग्य डिझाईन, प्रमाणित RCC किंवा HDPE पाइप्स वापरणं—हे सगळं केवळ कागदावरचं असावं. Taloja MIDC Pollution वास्तवात मात्र अधिकारांचा गैरवापर आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय ह्यांचा.
गट्टार नाले यांचे नियमित देखभाल आणि दुरुस्ती? तुमच्या नेतृत्वाखाली ते तर अशक्यच! चोकअप झालेल्या नाल्यांना साफ करणं किंवा सिट्लिंग, औद्योगिक कचरा काढून टाकणं—हे सगळं साक्षात ‘गल्लाभरती’साठी बाजूला ठेवलेलं दिसतंय. उद्योगधंदे पाण्यात बुडतात, पण साहेबांचे हात मात्र भरपूर ‘ओले’ दिसतायत. गट्टार नाले यांचे कचऱ्याची विल्हेवाट लावणे, प्रदूषण रोखणे, आणि MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, यांचं ‘आवश्यक’ मानलं जात नाही का? तुम्हाला वाटतंय काय?
MIDC च्या गट्टार नाले यांचे बांधकाम निकषांचं काय? BIS (Bureau of Indian Standards) च्या कोड्सचं काय? हे नियम तुमच्यासाठी नुसतं शोभेचं आहेत.गट्टार नाले यांचे साईटवर सुरक्षिततेचे उपाय, कामगारांसाठी PPE, आणि Occupational Safety Code पालन, हे सर्व तुमच्या नजरांखाली झाकून ठेवलेलं दिसतं. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या ‘बेफिकीर’ दृष्टिकोनामुळे स्थानिक जलस्रोत प्रदूषित होत आहेत आणि पिण्यायोग्य पाणी विषारी बनतंय. हाच तुमचा विकासाचा नवा मार्ग आहे का?
प्रकल्पाच्या कागदपत्रांची तयारी आणि मंजुरी? अगदीच दुर्मिळ गोष्ट आहे, कारण वास्तविकता म्हणजे, कामाच्या हिशोबाऐवजी ‘खिशाचा’ हिशोब जास्त महत्त्वाचा दिसतोय! MIDC मधील प्रत्येक नियम पाळणं म्हणजे तुमच्यासाठी विनोदच वाटतोय! साहेब, फक्त तुम्हाला विचारतोय की ‘जनतेचा विकास होतोय की फक्त तुमच्या संपत्तीचा?’एमआयडीसी लुट थांबवायची असेल तर पिता-पुत्रांना दूर करणे काळाची गरज आहे.