Talathi Recruitment : तलाठी परीक्षा संदर्भात एसआयटी नेमणूक करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे

•विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सध्या चालू आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याकरिता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध घोषणाबाजी देत आंदोलन केले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी तलाठी भरती संदर्भात एसआयटी नेमणूक करावी अशी मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. Talathi Recruitment
“परीक्षार्थी त्रस्त सरकार मस्त..”, “प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे सरकारचा धिक्कार असो…”अशा घोषणा विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देण्यात आल्या यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते आमदार बंटी पाटील, सचिन अहिर यांच्याकडून घोषणा देण्यात आली आहे. Talathi Recruitment
तलाठी भरतीत महाघोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले होते. परंतु त्यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर याप्रकरणी महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पुरावे न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. यावरुन आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील सर्व परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या वतीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. Talathi Recruitment