छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhajinagar Bribe News : लाच स्वीकारताना खाजगी व्यक्ती आणि तलाठीस अटक

•5 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाजगी व्यक्ती देविदास भाऊराव बकाल आणि तलाठी विनोद मुळे यास ताब्यात घेतले

छत्रपती संभाजीनगर :- प्लॉटवर फेरफार करण्यासाठी पंचांसमक्ष लाचेची मागणी करून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील मौजे गांधेली येथील तलाठी विनोद शेषराव मुळे (49 वय) खाजगी व्यक्ती देविदास भाऊराव बकाल (52 वय) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे पतीचे नावाने तालुका छत्रपती संभाजी नगर मध्ये मौजै गांधेली (शिवार गट क्र.133 मध्ये प्लॉट क्रमांक 40,41) होते.त्या प्लॉटचा तक्रारदार यांच्या नावाने फेर घेण्यासाठी तलाठी यांनी मागील महीन्यांपासुन प्रलंबित ठेवले होते ,24 एप्रिल रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छ.संभाजीनगर येथे तक्रार दिली होती. प्लॉटचा फेर घेण्यासाठी तलाठी मुळे व खाजगी व्यक्ती बकाल यांनी हे लाचेची मागणी करीत होते.

तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर 5 मे रोजी शासकिय पंचासह तक्रारदाराकडुन तलाठी यांची गांधेली सजा कार्यालय छ.संभाजी नगर या ठिकाणी लाचमागणी पडताळणी केली असता आरोपी देविदास बकाल खाजगी इसम यांनी फेर घेण्यासाठी स्वत:सह तलाठी मुळे यांच्या करीता पंचा समक्ष तक्रारदाराकडुन पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती पाच हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. तसेच तलाठी यांनी लाचेस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले . गांधेली येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन्ही लाचखोर व्यक्तींच्या विरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात तलाठी यांच्या विरोधात कलम 12 तर आरोपी खाजगी व्यक्ती यांच्याविरोधात 7(अ) भ्रष्टाचार अधिनियमन 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर ,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीलाल चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि छत्रपती संभाजीनगर सापळा पथक – पोलीस हवालदार रवींद्र काळे , अशोक नागरगोजे पोलीस अंमलदार सी एन बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0