Panvel News : मान्सून आला आणि टपाल नाक्यावरील वीस कोटींचा रस्ता पाण्यात गेला……

पनवेल महापालिका अनभिज्ञ कशी ? ठेकेदारावर कारवाई करावी
पनवेल / प्रतिनिधी:- गेल्या दोन – तीन दिवसांपासून पनवेलसह राज्यभरात मुसळधार पाउस सुरु आहे. या पहिल्याच पावसात टपाल नाक्याजवळील रस्त्यावर पाणी साचले, पावसाचा जोर वाढल्याने हे पाणी दुकानांमध्ये शिरले. पनवेल महानगर पालिकेने वीस कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता अवघ्या काही दिवसांपूर्वी बनवला आहे. मात्र ठेकेदाराने रस्ता बांधताना पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय केलीच नसल्याचे या ठिकाणी दिसते. ऐनवेळी दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. मग वीस कोटी रुपये खर्च नेमका कशावर केला ?

महापालिका आयुक्त फक्त कंत्राटावर सहया करतात, या रस्त्यांची पाहणी कोण करणार. नेहमीचा पाउस आणि या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय करणे ठेकेदाराला गरजेचे वाटले नाही की जबाबदार अधिका-यांनी त्याची पाहणीच केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. वीस कोटी रुपये रस्त्यावर खर्च केले असतील तर रस्त्यावर पाणी आलेच कसे. खर्च केलेले वीस कोटी रुपये नेमके कुठे गेले ? ते कोणाच्या घशात गेले याची चौकशी करावी


