मुंबई

Pankaj Bhoyar Replaces Sanjay Savkare : ‘डिमोशन’ की राजकीय खेळी? भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री अचानक बदलले, पंकज भोयर यांना संधी

• ‘जिल्ह्यात फिरकत नसल्याने नाराजी’; संजय सावकारे यांची बुलढाणा येथे बदली

मुंबई :- महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन करण्यात आले असून, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी हा बदल झाल्याचा शासन आदेश जारी केला. या निर्णयामागे भंडाऱ्यातील स्थानिक नेत्यांची आणि जनतेची सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. संजय सावकारे हे पालकमंत्री असूनही केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि जिल्हा नियोजन बैठकांपुरतेच जिल्ह्यात येत होते. यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या आणि स्थानिक पालकमंत्री हवा, अशी मागणी जोर धरत होती.

स्थानिकांची नाराजी दूर करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज आहे. पंकज भोयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे त्यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देऊन स्थानिक जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला गेला असावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0