Dombivli Crime News : शेअर मार्केट मध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने 36.91 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

•Dombivli Share Market Crime News या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली
डोंबिवली :- ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे अमिष दाखवून डोंबिवलीतील लोढा पलावा येथे राहणाऱ्या श्रीनाथकुमार विरराघहुल्लू बच्चु (46 वर्ष) यांची 36 लाख 91 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली आहे.
बच्चू यांना 27 जुलै ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत काही अनोळखी भामट्यानी व्हाट्सअपवर कॉल करून ऑनलाईन शेअर मार्केट मधुन शेअर्स खरेदी केल्यास अधिक परतावा मिळेल, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून तक्रारदार यांना डिमॅट अकाउंट ओपन करण्यास सागितले. डिमॅट अकाउंट मधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखवून एकुण 36 लाख 91 हजार 200 रूपये ही रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडली. त्यानंतर ही रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बच्चू यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या करत आहे.