मुंबईक्राईम न्यूज
Trending

Nalasopara Crime News : मारहाण करून,अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 24 तासात गजाआड

•मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; मारहाण करून, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या शारीरिक हवस असलेल्या नराधमाला पोलिसांनी केले अटक

नालासोपारा :- प्रेम संबंध असलेल्या प्रियकराने अल्पवयीन प्रियसीवर सातत्याने बलात्कार केल्याची घटना अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. प्रियकर धीरज कुमार बाळकृष्ण लडडा (29 वर्ष) याचे अल्पवयीन 17 वर्षीय मुली बरोबर प्रेम प्रकरण होते. मुलीला अठरा वर्षाच्या झाल्यानंतर लग्न करू अशी आमिष दाखवून सातत्याने त्याच्यावर शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच आरोपी प्रियकराने वेळोवेळी प्रियसीला तू जर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझ्या आईला सर्वकाही सांगेल असे धमकी देऊन सातत्याने तिच्यावर बलात्कार करत. प्रियसीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतप्त नराधमाने प्रियसी आणि तिच्या आईला जबर मारहाण केली होती.

प्रियसीच्या फिर्यादीवरून अर्नाळा पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्यादी यांच्या सांगण्यावरून आरोपी विरोधात भादवि 376(2),(एन),323,506 मला अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार सतीश जगताप , महेश वेल्हे यांनी घटनास्थळी जात संपूर्ण घटनेबाबत चौकशी केली. आरोपीला सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित आरोपी हा पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोंढवा पोलिसांच्या मदतीने आरोपीला कन्ट्रीवुड हबटावून जवळ, तिलीकानगर कोंढवा येथून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली केली.

Avinash-Ambure

पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे Avinash Ambure , सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख पोलीस निरीक्षक धनंजय पोरे दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार सतिष जगताप, पोलीस हवालदार महेश बेल्हे, हनुमंत सूर्यवंशी, सचीन चौधरी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा, या पथकाने आरोपीला अटक केली असून सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी आरोपीला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यात लपून असल्याचे पोलिसांना शोधून काढण्यास मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0